Marital Counselling

मित्र, मैत्रिणिनो ,

चैत्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

मागील लेखात आंपण बघितल कि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावीशी वाटते , पण मनात शंकाच शंका असतात. त्याबद्दल कुठे बोलायला सुद्धा नको वाटते . मागच्या आघाताचे ओरखडे ओलेच असतात , पण पुढे जायचे ठरवलेले असते . आता पुढे जायचे तर जोडी दाराची निवड कोणत्या निकषावर करायची ?

मागच्या वेळेचा अनुभव फारसा उत्साह वर्धक नसेल तर नक्की निकष कुठचे वापरायचे ह्याचा गोंधळ उडतो , अनुरूप जोडीदार पाहिजे म्हणजे नक्की काय?

मागे पत्रिका बघितली नाही म्हणूनच प्रोब्लेम आला का ?मग आता राशी गुण सगळच जमायला पाहिजे का नको?

अस सगळ, जुळवून समोर आलेल्या मुलाकडे किंवा मुलीकडे बघून काहीच वाटत नाही, आतला आवाज हो म्हणत नाही अशी पण वेळ येऊ शकते . कधी कधी बघितल्यावर लगेच वाटत कि हाच तो किंवा ती, पण चार दोन भेटी नंतर शंका येतात, काहूर निर्माण होत , काही वेळेस बुद्धी चोख आपल काम करते आणि तर्क शुद्धतेच्या आधारावर निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता निर्माण होते !!

शक्यता आणि शक्यता !!

पण समाजाच्या मानसिकतेमुळे कोणालाही प्रवाहाबाहेर राहणे , अविवाहित / एकटे राहणे नको वाटते. विधुर / घटस्फोटीत हे स्वतःशी मान्य करणे हे सुद्धा जड जाते . त्यामुळे लग्न ठरविण्याची घाई आणि तडजोडीचा विचार ह्याची धुमश्चक्री उडू शकते . अशा प्रकारच्या निर्णय प्रक्रिये मध्ये कधी कधी जबर किंमत मोजावी लागते

थोडक्यात

मित्र मैत्रिणींनो , ideal soul mate ही गोष्ट मग अस्तित्वात असते कि नाही ? त्याचा शोध तरी किती घ्यायचा ?

भेटूया परत , पुढील interesting मुद्यांसाठी

शुभेच्छा !!

आपले समुपदेशक 
सुरभी बर्वे 
८६००७ १५२९०
anju.barve@gmail.com

विवेक महाडिक 
९७६४२ २४८४२
vmahadik08@gmail.com